भूगर्भात कच्चं तेल तयार कसं होतं? वाचून बसेल धक्का!

संतोष कानडे

इराण

इराण युद्धामुळे जगातल्या अनेक देशांवर तेलसंकट येऊ घातलं आहे. भारतातही गॅसचा तुटवडा निर्माण झालाय.

अर्थव्यवस्था

जगाची अर्थव्यवस्था चालवणारं हे कच्च तेल जमिनीमध्ये नेमकं कसं तयार होतं, याची प्रक्रिया वाचली तर आश्चर्य वाटेल.

खडकांच्या फटी

जसं हे कच्चं तेल जमिनीखाली सापडतं, तसंच ते समुद्राखालीदेखील सापडतं. दोन्हीकडेही खडकांच्या फटींमधून हे तेल मिळून येतं.

वाळवंट

आज जिथे कोरडी जमीन किंवा वाळवंट आहे तिथे कोट्यवधी वर्षांपूर्वी समुद्र होता. पृथ्वीच्या भौगोलिक बदलांमुळे समुद्र आटला आणि जमीन वर आली.

जलचर जीव आणि वनस्पती

लाखो, कोट्यवधी वर्षांपूर्वी समुद्राच्या तळाशी जलचर जीव आणि वनस्पती गाडल्या गेल्या.. काळाच्या ओघात त्या अवशेषांवर माती, वाळू, गाळाचे थर साचले.

ऑक्सिजन

थरांमध्ये अडकलेल्या मृत जीवांना आणि वनस्पतींना ऑक्सिजन मिळला नाही, त्यामुळे त्यांचं नैसर्गिक विघटन झालं नाही.

कार्बन आणि हायड्रोजन

थरांचं वजन जसजसं वाढतं तसा खाल्या थारंवर दाब निर्माण होतो आणि उष्णता तयार होते. यामुळे मृत जीवांच्या अवशेषांमधील कार्बन आणि हायड्रोजनचे रुपांतर केरोजीनमध्ये होते.

केरोजीन

केरोजीन हा मेणासारखा पदार्थ असतो. जेव्हा तापमान ६० ते १२० अंश सेल्सियसपर्यंत जाते तेव्हा हे केरोजीन द्रवरुपात रुपांतरीत होते. याला हायड्रोकार्बन्स म्हणतात.

हायड्रोकार्बन

हेच हायड्रोकार्बन म्हणजे आपलं कच्चं तेल. जर तापपान आणखीच वाढले तर कच्च्या तेलाचं रुपांतर नैसर्गिक वायूमध्ये होतं.

तेल

जमिनीखाली किंवा समुद्राखाली तयार झालेले तेल हे वजनाने हलके असते. ते खडकांच्या छिद्रांमधून वर येण्याचा प्रयत्न करते.

ऑईल रिझर्व्होर

मात्र तेलावर एखादा भलामोठा खडक येतो आणि ते अडकून पडते. याला ऑईल रिझर्व्होर म्हणतात.

जीवाश्म इंधन

या कच्च्या तेलाला जीवाश्म इंधन असेही म्हणतात. कारण ते सजीवांच्या अवशेषांपासून बनलेले असते. कच्च्या तेलाचा साठा संपला की तो पुन्हा तयार व्हायला कोट्यवधी वर्षे लागतात.

घटनाट जंगलं

काही ठिकाणी खूप घटनाट जंगलं किंवा दलदलीचे प्रदेश असतात. तिथल्या वनस्पती जेव्हा जमिनीखाली गाडल्या जातात तेव्हा त्यांच्यावरील दाबामुळे त्याचं रुपांतर कोळश्यात होतं.

जलचर

याच वनस्पींसोबत सुक्ष्मजीव, जलचर गाडले गेले आणि योग्य तापमान मिळालं तर त्यातूनही कच्चं तेल किंवा नैसर्गिक वायू तयार होतो.

इंग्रजांनी सिंहगडावर जप्त केलेल्या सोन्याचं आजही गूढ का आहे?

<strong>येथे क्लिक करा</strong>