Apurva Kulkarni
वारीमध्ये रिंगण हा एक पारंपरिक आणि पवित्र सोहळा आहे. यात पवित्र पालखीच्या पुढे एक अश्व वर्तुळात धावत असतो.
हा अश्व संत श्री तुकाराम महाराज किंवा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आत्म्याचं प्रतीक मानला जातो.
अश्व जेव्हा धावत असतो तेव्हा तो भक्तीचा वेग, निष्ठा आणि संतांची शक्ती असते. त्यामुळे रिंगणामध्ये वारकरी धावतात.
अश्व ज्या जागेवर रिंगण करत असतो ती जागा पवित्र मानली जाते. ती माती वारकऱ्यांसाठी प्रसादासारखी असते.
रिंगण पाहण्यासाठी हजारो वारकरी जमतात. ते अश्वाच्या दर्शनाने धन्य होतात. अश्व धावल्यास तिथली माती ते कपाळी लावतात.
रिंगणासाठी अश्वाला विशेष शृंगार केला जातो. गळ्यात हार, अंगावर सुंदर वस्त्र आणि कपाळावर गंध असा श्रृगारात अश्व रिंगण सोहळ्यात धावतो.
रिंगण हे केवळ कार्यक्रम नसून तो भक्ती, परंपरा आणि संतांच्या आठवणींनी भरलेलं एक अध्यात्मिक केंद्र आहे.
अश्व रिंगण धावतो, आणि आमचं मनसुद्धा संतांच्या चरणाशी धावू लागतं! त्यामुळे वारीत अश्व रिंगणाला महत्त्व असतं.