Anushka Tapshalkar
आयुर्वेदात अश्वगंधाला खूप महत्त्व आहे. शक्ती, तणावमुक्त जीवन आणि मानसिक स्थैर्यासाठी ओळखली जाणारी अश्वगंधा ही महिलांच्या आरोग्यासाठी विशेष फायदेशीर आहे.
डॉ. प्राची बेनारा ( (स्त्रीरोगतज्ज्ञ व वंध्यत्व तज्ज्ञ, बिर्ला फर्टिलिटी अँड आयव्हीएफ, गुरुग्राम) यांनी दिलेल्या माहितीमुसार अश्वगंधाचे अनेक फायदे आहेत. त्याबद्दल पुढे जाणून घेऊया.
कोर्टिसॉल हा तणाव वाढवणारा हार्मोन आहे. अश्वगंधा या हार्मोनची पातळी नियंत्रित करून ताण-तणाव कमी करायला मदत करते. ताकद वाढवते.
अश्वगंधामुळे एकाग्रता, काम करण्याची क्षमता आणि प्रतिसाद देण्याचा स्पीड वाढतो. यामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि स्मरणशक्ती सुधारते.
अश्वगंधामध्ये विथाफेरिन नावाचा घटक असतो. ज्याच्यामुळे शरीरात कर्करोगाच्या नवीन पेशी तयार होण्यापासून रोखता येते. हे संयुग (Compound) कर्करोगाच्या पेशींना नष्ट करण्यास मदत करते.
अश्वगंधाच्या मुळांमध्ये ‘विथाफेरिन ए’ हे संयुग असते, जे संधिवाताच्या वेदना निर्माण करणाऱ्या प्रोस्टॅग्लॅंडिन्सच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवते. त्यामुळे संधिवातामुळे होणाऱ्या वेदना कमी होतात.
आश्वगंधाचे नियमित सेवन महिलांच्या लैंगिक इच्छेमध्ये वाढ करते. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि लैंगिक क्षमताही बळकट होते.
मेनोरॉजमध्ये अनेक मानसिक बदल महिला अनुभवतात. अशात दर अश्वगंधा घेतलं तर उद्भवणारी चिंता, नैराश्य, झोपेचे त्रास यासारख्या समस्या कमी करायला मदत होते.
अश्वगंधामध्ये असलेल्या जंतूनाशक आणि जीवाणूविरोधी गुणधर्मांमुळे UTI संक्रमण तसेच काही प्रसंगी लैंगिक संसर्गजन्य आजारांपासूनही बचाव होतो.