Apurva Kulkarni
अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी हिचा मोठा चाहता वर्ग आहे. मराठी कलाविश्वासोबत हिंदीतही अश्विनीची वेगळी ओळख आहे.
दरम्यान 'वरण भात लोणचा कोण नाय कोणचा' या चित्रपटात अश्विनी कुलकर्णी तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत आली होती.
अशातच अश्विनी कुलकर्णीने 'पोस्टमन' या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मराठी सिनेसृष्टीबद्दल भाष्य केलं आहे.
मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्रींना बोल्ड, हॉट सिन्स दिले जात नाही असं का? हा प्रश्न अश्विनीला विचारण्यात आला.
त्यावर उत्तर देताना आश्विनी म्हणाली की, 'मराठी मेकर्सला कळलेलंच नाही की, स्त्री कशी सुंदर दिसू शकते? मराठीमध्ये सर्वांना असं वाटतं की स्त्री ही नेहमी सोशिक असून तिने बंडच केला पाहिजे.'
मराठीत कास्टिंग काऊच आहे का? विचारल्यावर ती म्हणाली की, 'मला वाटतय मराठीत थोडी हिंमत कमी आहे. कदाचित लोक मला घाबरत असतील.'
'परंतु थेट कोणीच विचारत नाही, मला एका दिग्दर्शकाने भेटायला बोलावलं, भेटून आल्यास त्याने मॅसेज केला की, 'तु आज छान दिसत होतीस'... मला हे तो समोर सांगू शकत होता.'
पुढे ती म्हणाली की, 'हे अंडरकरंट असणं खूप धोकादायक आहे. त्यामुळे आपण सुरक्षित आहोत की नाही अशी भावना समोर येते.'