Anuradha Vipat
अभिनेत्री अश्विनी महांगडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे
फोटो शेअर करीत अश्विनीने लिहिले आहे की, “विद्या विसरावी, चाक रुतावं, कवचकुंडलं काढून घ्यावीत. तरीही हिमतीनं रणांगणावर ठाम उभं राहावं अन् तेही हसत”
तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे.
अश्विनी नुकतीच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत दिसली होती.
आता अश्विनी महांगडे ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अश्विनी महांगडे सोशल मिडीयावर सक्रिय असते