Pranali Kodre
आशिया कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात २८ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान आमने - सामने असणार आहेत.
India vs Pakistan Head to Head
Sakal
आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होणार आहे. यापूर्वी ४१ वर्षात या स्पर्धेत कधीही अंतिम सामना या दोन संघात झाला नव्हता.
India vs Pakistan Head to Head
Sakal
तसेच आशिया कप २०२५ मध्ये मात्र भारत आणि पाकिस्तान तिसऱ्यांदा आमने सामने येणार आहे.
India vs Pakistan Head to Head
Sakal
आशिया कप २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानला साखळी फेरीत ७ विकेट्स आणि सुपर फोरमध्ये ६ विकेट्सने पराभूत केले होते. यानंतर आता तिसऱ्यांदा हे दोन संघ अंतिम सामन्यात आमने-सामने आहेत.
India vs Pakistan Head to Head
Sakal
भारत आणि पाकिस्तान संघात आत्तापर्यंत १५ टी२० सामने खेळवण्यात आले आहेत, यातील १२ सामने भारताने जिंकले आहेत आणि ३ सामने पाकिस्तानने जिंकले आहेत.
India vs Pakistan Head to Head
Sakal
तसेच आशिया कपमध्ये (वनडे आणि टी२० मिळून) भारत आणि पाकिस्तान संघात २० सामने झाले असून १२ सामने भारताने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने ६ सामने जिंकले आहेत. २ सामने अनिर्णित राहिलेत.
India vs Pakistan Head to Head
Sakal
टी२० प्रकारात झालेल्या आशिया कपबाबत सांगायचं झाले, तर ५ सामने दोन्ही संघात आत्तापर्यंत झाले असून यातील ४ सामने भारताने जिंकलेत. या ४ मधील दोन विजय तर आशिया कप २०२५ मधीलच आहेत.
India vs Pakistan Head to Head
Sakal
याशिवाय भारताने पाकिस्तानविरुद्ध वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये गेल्या ७ सामन्यात सलग विजय मिळवले आहेत.
India vs Pakistan Head to Head
Sakal
Kuldeep Yadav
Sakal