Pranali Kodre
भारतीय संघाने आशिया कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता अंतिम सामना पाकिस्तानविरुद्ध २८ सप्टेंबरला खेळायचा आहे.
Team India
Sakal
त्यापूर्वीच भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने टी२० आशिया कपमध्ये इतिहास घडवला आहे.
Kuldeep Yadav - Suryakumar Yadav
Sakal
कुलदीप यादवने सुपर फोरमधील श्रीलंकेविरुद्ध शेवटच्या सामन्यात २६ सप्टेंबर रोजी १ विकेट घेतली होती.
Kuldeep Yadav
Sakal
कुलदीप यादवने आता आशिया कप २०२५ स्पर्धेत ६ सामन्यांत १३ विकेट्स घेतल्या आहेत.
Kuldeep Yadav
Sakal
त्यामुळे कुलदीप एकाच टी२० प्रकारातील आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
Jasprit Bumrah - Kuldeep Yadav
Sakal
कुलदीप यादवने युएईच्या अमजाद जावेदला मागे टाकले आहे. २०१६ च्या टी२० आशिया कप स्पर्धेत अमजाद जावेदने १२ विकेट्स घेतल्या होत्या.
Amjad Javed
Sakal
त्यापाठोपाठ या यादीत तिसऱ्या क्रमांकावर बांगलादेशचा अल-अमिम हुसैन, युएईचा मोहम्मद नवीद आणि भारताचा भूवनेश्वर कुमार संयुक्तरित्या आहेत.
Al-Amin Hossain, Mohammad Naveed, Bhuvneshwar Kumar
Sakal
अल-अमिम हुसैन आणि मोहम्मद नवीद यांनी २०१६ मध्ये, तर भुवनेश्वर कुमारने २०२२ मध्ये ११ विकेट्स घेतल्या होत्या.
Al-Amin Hossain, Mohammad Naveed, Bhuvneshwar Kumar
Sakal
Vaibhav Suryavanshi
Sakal