Pranali Kodre
आशिया कप २०२५ स्पर्धा ९ ते २८ सप्टेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिराती येथे खेळवली जाणार आहे.
यंदा टी२० स्परुपात ही स्पर्धा होणार आहे. आत्तापर्यंत १६ वेळा आशिया कप स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाले असून यंदाची १७ वी स्पर्धा असेल.
१९८४ साली सुरू झालेल्या या स्पर्धेत आधी वनडे स्वरुपात स्पर्धा होत होत्या. पण गेल्या काही वर्षांपासून आगामी आयसीसी स्पर्धांच्या दृष्टीने कधी वनडे, तर कधी टी२० स्वरुपात ही स्पर्धा होते.
२०२६ मध्ये टी२० वर्ल्ड कप होणार असल्याने यंदा टी२० प्रकारात आशिया कप २०२५ स्पर्धा आशिया खंडातील ८ देशात खेळवली जात आहे.
आत्तापर्यंत भारताने सर्वाधिक ८ वेळा आशिया कप स्पर्धा जिंकली आहे. भारताने १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६, २०१८ आणि २०२३ साली विजेतेपद मिळवले आहे.
भारतापाठोपाठ श्रीलंकेने सहावेळा ही स्पर्धा जिंकली. श्रीलंकेने १९८६, १९९७, २००४, २००८, २०१४ आणि २०२२ मध्ये ही स्पर्धा जिंकली.
पाकिस्तानने दोनवेळा आशिया कप जिंकला आहे. त्यांनी २००० आणि २०१२ साली ही स्पर्धा जिंकली.