Pranali Kodre
आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी १९ ऑगस्ट रोजी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.
भारतीय संघ निवडीबद्दलचे महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ.
आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी भारताच्या टी२० संघाचे उपकर्णधारपद शुभमन गिलला देण्यात आले आहे. यापूर्वी ही जबाबदारी अक्षर पटेलकडे होती.
यशस्वी जैस्वाल, वॉशिंग्टन सुंदर आणि श्रेयस अय्यर यांना आशिया कपसाठी १५ जणांच्या मुख्य भारतीय संघात स्थान मिळाले नाही.
पण जैस्वाल आणि सुंदर ५ जणांच्या राखीव खेळाडूंमध्ये आहेत, पण श्रेयस अय्यरला राखीव खेळाडूंमध्येही जागा नाही.
जसप्रीत बुमराहसोबत हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांचा वेगवान गोलंदाज म्हणून भारतीय संघात समावेश.
वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना फिरकी गोलंदाज म्हणून भारतीय संघात समावेश आहे.
संजू सॅमसनसह जितेश शर्माला यष्टीरक्षक म्हणून भारतीय संघात संधी मिळाली आहे. रिषभ पंतचा पाय फ्रॅक्चर असल्याने त्याचा विचार झाला नाही.
आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे या दोघांना अष्टपैलू खेळाडू म्हणून संधी मिळाली आहे.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्थी, रिंकू सिंग
प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग व वॉशिंग्टन सुंदर