Asian Games: अमरावतीच्या कुमकुमने जिंकले दोन गोल्ड, एक सिल्व्हर अन् ऑलिम्पिक कोटा!

Pranali Kodre

कुमकुमने रचला इतिहास

जेव्हा इतर मुले सोशल मीडिया आणि मोबाईलमध्ये व्यस्त असतात, तेव्हा अमरावतीच्या १७ वर्षांच्या एका मुलीने जपानच्या भूमीवर इतिहास रचला आहे. ही मुलगी आहे कुमकुम अनिल मोहोड.

Amravati Kumkum Mohod Bags Historic Recurve Archery Gold Medal

|

Sakal

ऐतिहासिक सुवर्णपदक

१२ वीत शिकणाऱ्या कुमकुमने Asian Games मध्ये दक्षिण कोरिया आणि चीनच्या जागतिक विजेत्या खेळाडूंना हरवून रिकर्व्ह आर्चरीत भारताला पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून दिलंय.

Amravati Kumkum Mohod Bags Historic Recurve Archery Gold Medal

|

Sakal

एकूण तीन पदके

तिने एशिन गेम्समध्ये तिरंदाजीच्या रिकर्व्ह महिला सांघिक आणि मिश्र सांघिक प्रकारातही अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य जिंकण्याचा पराक्रम केला.

Amravati Kumkum Mohod Bags Historic Recurve Archery Gold Medal

|

Sakal

वडील

पण हा प्रवास सोपा नव्हता...कुमकुमचे वडील अनिल मोहोड हे अमरावतीत मिठाईच्या दुकानांसाठी पुठ्ठ्याचे बॉक्स बनवण्याचे काम करतात.

Amravati Kumkum Mohod Bags Historic Recurve Archery Gold Medal

|

Sakal

सरावाची सुरुवात

सुरुवातीला महागडे धनुष्य घेणे शक्य नसल्याने तिने लाकडी धनुष्यापासून सरावाला सुरुवात केली.

Amravati Kumkum Mohod Bags Historic Recurve Archery Gold Medal

|

Sakal

नजरेतील चमक अन् खांद्यातील ताकद

पण, तिच्या नजरेतील चमक आणि खांद्यांमधील ताकद तिचे प्रशिक्षक प्रफुल्ल डांगे यांनी पहिल्याच दिवशी ओळखली.

Amravati Kumkum Mohod Bags Historic Recurve Archery Gold Medal

|

Sakal

सराव सुरूच ठेवला

उन्हाळा असो, पाऊस असो की दिवाळी-दसऱ्याचा सण... कुमकुमने सराव कायम ठेवला.

Amravati Kumkum Mohod Bags Historic Recurve Archery Gold Medal

|

Sakal

सोशल मीडियाला ठेवलं दूर

कुमकुमने स्वतःहून यूट्यूबही डिलीट केले आणि सोशल मीडियापासूनही ती दूर राहिली. कारण तिच्या डोक्यात फक्त एकच ध्येय होते.

Amravati Kumkum Mohod Bags Historic Recurve Archery Gold Medal

|

Sakal

अन् तो क्षण आला

अखेर ३ ऑक्टोबर २०२६ रोजी तो क्षण आला. समोर होती ३० वर्षांची अनुभवी आणि जागतिक दर्जाची ऑलिम्पिक चॅम्पियन खेळाडू ओ येजिन.

Amravati Kumkum Mohod Bags Historic Recurve Archery Gold Medal

|

Sakal

शेवटचा बाण अन्...

सामना अतिशय अटीतटीचा झाला. सर्वांचे लक्ष शेवटच्या बाणावर होते आणि कुमकुमने धनुष्याची प्रत्यंचा खेचली, श्वास रोखला... बाण सुटला... आणि थेट १० गुणांच्या केंद्रबिंदूवर धडकला आणि कुमकुम गोल्ड मेडली मानकरी ठरली.

Amravati Kumkum Mohod Bags Historic Recurve Archery Gold Medal

|

Sakal

ऑलिम्पिक कोटा

तिनं फक्त सुवर्णपदक जिंकलं नाही, तर २०२८ च्या लॉस एन्जेलिस ऑलिम्पिकचा कोटा देखील मिळवला. त्यामुळे आता अमरावतीची कुमकुम ऑलिम्पिक खेळतानाही दिसू शकते.

Amravati Kumkum Mohod Bags Historic Recurve Archery Gold Medal

|

Sakal

Asian Games: भारताने पाकिस्तानला हरवून जिंकलं Gold Medal; पाहा सेलिब्रेशनचे Photo

India Cricket Team Asian Games Gold Medal Celebration

|

Sakal

येथे क्लिक करा