Saisimran Ghashi
गुरु ग्रह शुभ असला तरी त्याच्या आक्रमक हालचाली अप्रीय घटनांना निमंत्रण देऊ शकतात.
गुरु ग्रहाच्या आक्रमक हालचालीमुळे ५ राशींना नोकरी आणि व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
मीन राशीसाठी हा काळ भावनिक अस्थिरता, अनावश्यक खर्च आणि आरोग्याच्या समस्यांनी भरलेला असू शकतो.
गुरुच्या जलद गतीमुळे मिथुन राशीतील लोकांना करिअर आणि कौटुंबिक जीवनात अस्थिरता जाणवू शकते.
कन्या राशीच्या लोकांनी व्यावसायिक करार करताना स्पष्ट संवाद आणि सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
धनु राशीतील लोकांना आर्थिक अडचणी, चुकीच्या गुंतवणुकीचा धोका आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे.
मकर राशीतील व्यक्तींना कामाचा ताण, मानसिक थकवा आणि नातेसंबंधांमध्ये दुरावा जाणवू शकतो.
हा काळ संयम, स्पष्टता, मानसिक संतुलन आणि योग्य निर्णय घेण्याचा आहे. घाई किंवा अति आत्मविश्वास टाळा.