Saisimran Ghashi
डिप्रेशन हे खूपच धोकादायक आहे कारण हे जीवघेणे ठरू शकते
त्यामुळे याची लक्षणे ओळखणं मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे
मनात कोणत्याही गोष्टीची उत्सुकता राहत नाही, सतत निराश वाटतं.
झोप न लागणं (इन्सोम्निया) किंवा गरजेपेक्षा जास्त झोप येणं.
साध्या गोष्टींसाठीही ऊर्जा वाटत नाही, थकवा जाणवतो.
"मी चुकतोय", "माझ्यामुळे सगळं बिघडलंय" असे विचार वारंवार येणं.
साध्या निर्णयांमध्येही गोंधळ होतो, लक्ष केंद्रित करता येत नाही.
अशी लक्षणं सतत २ आठवड्यांपेक्षा अधिक काळ जाणवत असतील, तर त्वरित मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.