Saisimran Ghashi
15 जून 2025 पासून मिथुन राशीत बुध आणि सूर्य एकत्र येऊन बुधादित्य राजयोग तयार करत आहेत, जो ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो.
करिअरमध्ये बदल, नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा यशस्वी गुंतवणूक करण्यासाठी हा काळ उत्तम आहे
वृषभ राशीच्या लोकांना या योगामुळे व्यवसायात मोठा फायदा होईल. गुंतवणुकीतून लाभ, नवीन संपर्क, प्रकल्पांमध्ये यश आणि पदोन्नतीची संधी मिळू शकते.
मिथुन राशीसाठी हा काळ अतिशय खास ठरेल. कार्यक्षमता आणि आत्मविश्वास वाढेल. नोकरी, स्पर्धा परीक्षा किंवा व्यवसायात यशाची शक्यता आहे.
तूळ राशीच्या व्यक्तींना जुन्या नुकसानातून सावरण्याची संधी मिळेल. कुटुंबीयांबरोबर नवीन व्यवसाय सुरू होऊ शकतो. न्यायालयीन प्रकरणेही सुटण्याची शक्यता आहे.
बुधादित्य योगामुळे सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. लोकांवर गोड बोलण्यामुळे चांगली छाप पडेल.
या काळात तुम्हाला अध्यात्मिक व धार्मिक गोष्टींमध्ये रस वाटू शकतो, मानसिक शांती मिळेल आणि नवे दृष्टिकोन विकसित होतील.
ही केवळ सामान्य माहिती आहे. सकाळ माध्यम समूह कोणत्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही