पार्लरला विसरा! फक्त 5 स्टेप्समध्ये घरच्या घरी करा हेअर स्पा

Aarti Badade

केसांच्या समस्यांवर मात

केस गळणे, कोंडा आणि अकाली पांढरे होणे या समस्या आजकाल वाढल्या आहेत. यावर घरगुती 'हेअर स्पा' हा एक उत्तम आणि स्वस्त उपाय आहे.

Hair Spa at home

|

Sakal

तेलाने मसाज

हेअर स्पाची सुरुवात मसाजने करा. खोबरेल तेल, बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑईल कोमट करून केसांना मुळापासून मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते.

Hair Spa at home

|

Sakal

केसांना वाफ द्या

एक सुती कपडा गरम पाण्यात भिजवून पिळून घ्या आणि तो केसांभोवती १० ते १५ मिनिटे गुंडाळून ठेवा. यामुळे तेलाचे पोषण केसांच्या आतपर्यंत पोहोचते.

Hair Spa at home

|

Sakal

केस स्वच्छ धुवा

वाफ दिल्यानंतर केस शॅम्पू आणि कोमट पाण्याने धुवून घ्या. यामुळे केसांवरील अतिरिक्त तेल आणि साचलेली सर्व घाण निघून जाईल.

Hair Spa at home

|

Sakal

नॅचरल हेअर मास्क

केसांना चमक देण्यासाठी घरगुती मास्क लावा. यासाठी पिकलेले केळे, दही, मध आणि कोरफडीचा रस एकत्र करून त्याची पेस्ट केसांवर लावा.

Hair Spa at home

|

Sakal

मास्क किती वेळ ठेवावा?

हा हेअर मास्क केसांवर २० ते ३० मिनिटे राहू द्या. यातील नैसर्गिक घटक केसांना मुळापासून हायड्रेट करतात आणि फाटे फुटणे थांबवतात.

Hair Spa at home

|

sakal

शेवटचा वॉश

मास्क लावल्यानंतर केस फक्त साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. लक्षात ठेवा, यावेळी शॅम्पू वापरू नका, जेणेकरून मास्कचा ओलावा केसांत टिकून राहील.

Hair Spa at home

|

Sakal

रेशमी आणि मऊ केस

या नैसर्गिक उपचारामुळे तुमचे केस केमिकल फ्री पद्धतीने मऊ, सिल्की आणि शाईनी होतात. पार्लरपेक्षाही चांगला ग्लो तुम्हाला घरीच मिळेल.

Hair Spa at home

|

Sakal

हेअर स्पा कधी करावा?

उत्तम रिझल्टसाठी महिन्यातून किमान दोन वेळा हा घरगुती हेअर स्पा नक्की करा. यामुळे केसांचे आरोग्य दीर्घकाळ टिकून राहते.

Hair Spa at home

|

Sakal

वाढलेलं कोलेस्ट्रॉल होईल कमी! खा 'हे' 7 सुपरफूड्स!

वाढलेलं कोलेस्ट्रॉल कसं कमी करावं? फॉलो करा 'या' टिप्स अन् तुमचं हृदय ठेवा सुरक्षित!

येथे क्लिक करा