Pranali Kodre
भारताचा क्रिकेटपटू केएल राहुल नुकताच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून घरी परतला आहे.
केएल राहुलच्या आयुष्यात आणखी एक आनंदाचा क्षण लवकरच येणार आहे.
त्याची पत्नी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी प्रेग्नंट आहे.
त्यामुळे अथिया आणि केएल राहुल हे लवकरच आई-बाबा होणार आहेत.
केएल राहुल घरी परतल्यानंतर अथियाने त्यांच्या मॅटरनिटी फोटोशुटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये अथिया बेबी बंपही फाँट करताना दिसत आहे.
अथियाने या पोस्टला 'ओह बेबी' असं कॅप्शन दिलं आहे.
तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केली असून लाखो लाईक्स आले आहेत.