ATM Charges : एटीएम व्यवहारांवर शुल्क लागणार? जाणून घ्या ATM शुल्काचे हे ८ महत्त्वाचे नियम

Sandeep Shirguppe

आरबीआयचा नियम

बँकांना ग्राहकांना दरमहा ठराविक एटीएम व्यवहार मोफत देणे बंधनकारक आहे.

atm charges

|

ESakal

स्वतःच्या बँकेचे एटीएम

सामान्य बचत खात्यांसाठी स्वतःच्या बँकेच्या एटीएमवर दरमहा किमान ५ व्यवहार मोफत असतात.

ATM

|

ESakal

मेट्रो शहरांमध्ये मर्यादा

मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये दुसऱ्या बँकेच्या एटीएमवर दरमहा ३ व्यवहार मोफत मिळतात.

ATM

|

ESakal

इतर ठिकाणी ५ व्यवहार

मेट्रो शहरांव्यतिरिक्त इतर शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात दुसऱ्या बँकेच्या एटीएमवर दरमहा ५ व्यवहार मोफत असतात.

ATM

|

ESakal

आर्थिक-बिगर आर्थिक व्यवहार

पैसे काढण्यासोबतच बॅलन्स तपासणे, पिन बदलणे अशा बिगर-आर्थिक व्यवहारांचाही मोफत व्यवहारांच्या मर्यादेत समावेश होतो.

ATM

|

ESakal

मर्यादा संपल्यानंतर शुल्क

मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर बँक प्रति व्यवहार कमाल २३ रुपये शुल्क आकारू शकते.

ATM

|

ESakal

जीएसटीमुळे वाढतो खर्च

२३ रुपयांच्या शुल्कावर १८ टक्के जीएसटी आकारला जातो. त्यामुळे एका अतिरिक्त व्यवहारासाठी एकूण २७.१४ रुपये खर्च होऊ शकतात.

ATM

|

ESakal

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाचा बदल

१ ऑक्टोबर २०२६ पासून काही सॅलरी अकाउंट्ससाठी दुसऱ्या बँकेच्या एटीएमवरील मोफत व्यवहार १० वरून ५ होणार आहेत.

ATM

|

ESakal

आणखी पाहा...