kimaya narayan
आई कुठे काय करते फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आलीये.
मधुराणीने नुकतंच पांढऱ्या शर्टमधील फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं. आशय तुलावर याने शूट केलेल्या फोटोशूटने प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या.
मधुराणीचा हा बोल्ड अंदाज पाहून चाहते घायाळ झाले. अनेकांनी कमेंट करत तिच्या हॉट अंदाजाचं कौतुक केलं.
तर काहींनी तिच्या या फोटोशूटवर टीका केली. "तिला हे असं फोटोशूट शोभत नाही.","मधुराणीने हे असले प्रकार करू नयेत" अशा कमेंट्स अनेकांनी या फोटोशूटवर केल्या.
तर तिच्या फोटोशूटवर अनिरुद्धला टॅग करत मिम्स बनवले. ज्यात अनिरुद्ध मालिका पुन्हा सुरु करण्याची मागणी करतोय.
आई कुठे काय करते ही तिची मालिका गाजली. या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने मधुराणीला ओळख मिळाली.
सध्या मधुराणी 'ज्याचा त्याचा विठ्ठल' या नाटकात काम करतेय.