Aarti Badade
बुधाच्या मार्गी होण्यामुळे नवीन लोकांशी संपर्क येईल आणि प्रवासाची शक्यता असेल. शिक्षण व संवाद क्षेत्रात प्रगती होईल. व्यवसायात काही चढ-उतार असले तरी योग्य निर्णय फायदेशीर ठरतील. मालमत्तेशी संबंधित प्रश्न तुमच्या बाजूने सुटू शकतात.
धैर्य आणि आत्मविश्वासात वाढ होईल. नोकरीत पदोन्नती व नवीन जबाबदाऱ्या मिळतील. विशेषतः परदेशातील संधी लाभदायक ठरतील. कौटुंबिक जीवनात पाठिंबा मिळेल.
स्वामी बुध असल्यामुळे संवाद व विचार स्पष्ट होतील. निर्णयक्षमता वाढेल. कुटुंबात शुभकार्य होण्याची शक्यता आहे. जनसंपर्क व राजकारण क्षेत्रात चांगले यश मिळेल.
बुद्धिमत्ता व सर्जनशीलता वाढेल. आत्मपरीक्षणाला उत्तम वेळ. खर्च वाढू शकतो, पण परदेश प्रवासाचे संकेत आहेत. सामाजिक संबंध अधिक दृढ होतील.
खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक. मानसिक स्पष्टता येईल. जुन्या समस्या सुटण्याची शक्यता. व्यवसायातील बदल फायदेशीर ठरतील.
बुध नफा स्थानात असल्याने उत्पन्न वाढेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य वेळ. बेरोजगारांना संधी मिळतील. आरोग्य व सामाजिक प्रतिष्ठा सुधारेल.
मानसिक तणाव जाणवू शकतो. कामाच्या ठिकाणी बदल संभव. बोलण्यावर व रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक. विचारपूर्वक निर्णय फायदेशीर ठरतील.
भावनिक गोंधळ वाढू शकतो. व्यवसायात नवीन भागीदार मिळू शकतात. नोकरीत वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. स्पर्धा परीक्षेसाठी कठोर मेहनत आवश्यक.
शेअर बाजार, लॉटरीतून लाभ होऊ शकतो. सर्जनशील कामात यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. प्रेमसंबंध गोड होतील.
कौटुंबिक मतभेद संभवतात. पैशांचे नुकसान होऊ शकते. व्यवसायातून उत्पन्न वाढेल. संयम आणि समजूतदारपणा आवश्यक.
संपत्ती वाढेल. सर्जनशीलता वाढेल. शेती आणि जमिनीशी संबंधित फायदे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
तणाव आणि चिंता जाणवू शकते. आरोग्याची काळजी घ्या. प्रेमसंबंध दृढ होतील. आर्थिक बाबतीत शहाणपणा आवश्यक.