Yashwant Kshirsagar
महाराष्ट्रातील एक शहर देशात नव्हे जगात कंडोमची राजधानी म्हणून ओळखले जाते. ते शहर कोणते आणि का प्रसिद्ध आहे हे जाणून घेऊया.
कंडोमची राजधानी म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील शहर म्हणजे औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर ) आहे. पण या शहराला ही ओळख कशी मिळाली ते जाणून घेऊया.
औरंगाबादला कंडोमची राजधानी म्हणून ओळखले जाते कारण देशातील सर्वात जास्त कंडोम बनविणाऱ्या कंपन्या येथे आहेत.
देशभरात कंडोमचा पुरवठा होतो यात औरंगाबादमधील कंपन्यांचा रोल मोठा आहे. जाणून घेऊया इथे महिन्याला किती कंडोम तयार होतात.
औरंगाबादमध्ये दर महिन्याला 10 कोटी कंडोम तयार होतात. इथून जगभरातील अनेक देशांत कंडोमचा पुरवठा केला जातो.
औरंगाबादमध्ये तयार होणारे कंडोम युरोप, लॅटिन अमेरिका, अफ्रिका आणि आशियाई देशांत केली जाते.
कंडोमची मोठ्या प्रमाणात निर्मिती आणि पुरवठ्यामुळे या शहराला कंडोमची राजधानी म्हणून ओळखले जाते.