औरंगजेबाच्या आयुष्यातील 10 धक्कादायक गोष्टी

संतोष कानडे

औरंगजेब

औरंगजेबाचा जन्म 3 नोव्हेंबर 1618 रोजी गुजरातमधील दाहोद येथे झाला. तो मुघल सम्राट शाहजहान आणि मुमताज महल यांचा तिसरा मुलगा होता.

युद्ध

इ.स. 1658 मध्ये गादी मिळवण्यासाठी औरंगजेबाने आपल्या भावांविरुद्ध युद्ध केले. त्यात दारा शुकोहचा पराभव करून त्याला मृत्युदंड देण्यात आला, तर मुराद बख्श आणि शुजा यांनाही सत्तासंघर्षात पराभूत केले.

शाहजहान

औरंगजेबाने आपले वडील शाहजहान यांना आग्रा किल्ल्यात नजरकैदेत ठेवले. शाहजहान यांचा मृत्यू 1666 मध्ये तेथेच झाला.

जिझिया कर

इ.स. 1679 मध्ये औरंगजेबाने जिझिया कर पुन्हा लागू केला. हा निर्णय त्याच्या कारकिर्दीतील सर्वाधिक वादग्रस्त निर्णयांपैकी एक मानला जातो.

हिंदू मंदिरे

औरंगजेबने काही हिंदू मंदिरे पाडण्याचे आदेश देण्यात आल्याच्या नोंदी तत्कालीन फारसी दस्तऐवज आणि इतिहासग्रंथांमध्ये आढळतात. मात्र, सर्व मंदिरे पाडली गेली असा दावा ऐतिहासिकदृष्ट्या योग्य मानला जात नाही.

दख्खन मोहीम

इ.स. 1681 ते 1707 या काळात औरंगजेबाने जवळपास 26 वर्षे दख्खन मोहिमेत घालवली. मराठ्यांविरुद्धचा हा दीर्घ संघर्ष मुघल साम्राज्यासाठी अत्यंत खर्चिक ठरला.

ऐतिहासिक नोंदी

औरंगजेब वैयक्तिक जीवनात साधेपणा पाळत असे, अशी अनेक ऐतिहासिक नोंदी आहेत. त्याने स्वतःच्या खर्चासाठी टोपी शिवणे आणि कुराणाच्या हस्तलिखित प्रती लिहून मिळालेला पैसा वापरल्याचे उल्लेख आढळतात.

अहमदनगर

इ.स. 1707 मध्ये अहमदनगरजवळ त्याचा मृत्यू झाला. त्याच्या इच्छेनुसार छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील खुलताबाद येथे अत्यंत साध्या कबरीत त्याचे दफन करण्यात आले.

मुघल साम्राज्य

इतिहासकारांच्या मते, औरंगजेबाच्या दीर्घ दख्खन मोहिमा, सततची युद्धे आणि प्रचंड लष्करी खर्च यांमुळे मुघल साम्राज्य आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाले. त्याच्या मृत्यूनंतर काही दशकांतच मुघल सत्तेची पकड झपाट्याने ढासळू लागली.

पंढरपूर वारीतल्या 'या' 5 परंपरा शेकडो वर्षांपासून सुरु आहेत

<strong>येथे क्लिक करा</strong>