सकाळ वृत्तसेवा
संपूर्ण आयुष्यात औरंगजेब दोनवेळा प्रेमात पडला होता. परंतु एकही प्रेम त्याच्या नशिबात नव्हतं.
पूर्वाश्रमीचं औरंगाबाद आणि आताचं छत्रपती संभाजी नगर येथील हिराबाई जैनाबादीच्या तो प्रेमात होता.
दुसऱ्या प्रेमात औरंगजेब ठार वेडा झाला होता. परंतु त्या स्त्रीने त्याला नाकारलं आणि त्याला कायमचा धडा शिकवला.
दुसरी स्त्री एक हिंदू नर्तकी होती. बादशहा शाहजहानच्या दरबारात ती नृत्य करायची. ती धार्मिक विचारांची होती.
त्या स्त्रीचे विचार, धार्मिक वृत्ती आणि चरित्र वाखणण्याजोगं होतं. औरंगजेबाचा भाऊ दारा शिकोह तिच्याच प्रेमात होता.
दारा शिकोह त्या महिलेच्या एवढं प्रेमात होता की, तिच्याशिवाय त्याला दुसरं काहीच दिसत नव्हतं. या स्त्रीमुळेच औरंगजेबाने भावाची हत्या केल्याचं सांगितलं जातं.
दारा शिकोहच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने त्या महिलेसमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवला, नाना तऱ्हेने प्रयत्न केले. परंतु काहीही होऊ शकलं नाही.
मी मरन पत्करेन पण तुझ्यासोबत राहणार नाही, अशी भूमिका त्या महिलेने घेतली. तिचं नाव होतं राणा-ए-दिल. ती दारा शिकोहची उपपत्नी होती.
दाराने तिच्यावर जीवापाड प्रेम केलं होतं. सुरुवातीला त्याचंही प्रेम तिने नाकारलं होतं. परंतु प्रेमातला खरेपणा लक्षात आल्यानंतर ती राजी झाली.
राणा-ए-दिल एक हिंदू नर्तकी होती. तिच्या प्रेमात दारा एवढा पागल झाला की त्याला दरबारी कामकाज सुचत नव्हतं. लोक त्याची चेष्टा करत होते.