सोन्यातही भेसळ! 'गोल्ड'मध्ये मिसळली जाणारी पावडर काय आहे?

संतोष कानडे

रेनियम

सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ करण्यासाठी चीनमधून येणाऱ्या रेनियम या धातूच्या पावडरचा वापर होत असल्याचा धक्कादायक दावा समोर आला आहे.

जड

रेनियम हा दुर्मीळ आणि वजनाने जड असलेला धातू आहे.

पावडर

ही पावडर सोन्यात मिसळल्यास दागिन्याचे एकूण वजन वाढू शकते; मात्र सोन्याचे प्रत्यक्ष प्रमाण कमी राहू शकते.

राजस्थान

राजस्थानमधील जोधपूर येथे एका वृत्तपत्राने दिलेल्या शोध बातमीनंतर हे प्रकरण उघड झालेलं आहे.

प्रयोग

या प्रयोगात ७.८३ ग्रॅम २४ कॅरेट सोन्यात एक ग्रॅम रेनियम पावडर मिसळण्यात आल्याचे वृत्त आहे.

हॉलमार्क

त्यानंतर तयार केलेल्या दागिन्याला २२ कॅरेटचा हॉलमार्क मिळाल्याचा दावा करण्यात आला.

सोन्याचे प्रमाण

मात्र, तपासाच्या गणनेनुसार त्या दागिन्यात सोन्याचे प्रमाण सुमारे ८१.७ टक्के म्हणजे जवळपास २० कॅरेट होते.

भेसळ

विशेष म्हणजे, काही नियमित तपासणी यंत्रांनाही या भेसळीचा शोध घेता आला नसल्याचे वृत्त आहे.

तपास

हा एका तपासातील प्रयोग आहे. देशभरात अशा प्रकारची भेसळ मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही.

दागिने

सोन्याचे दागिने खरेदी करताना हॉलमार्क, HUID क्रमांक आणि विश्वासार्ह विक्रेत्याकडून मिळणारे बिल यांची खात्री करणे महत्त्वाचे आहे.

मोबाईलची बॅटरी थंडीत लवकर का संपते?

mobile

|

esakal

<strong>येथे क्लिक करा</strong>