औरंगजेबाने सख्ख्या भावाचं शीर कापून वडिलांकडे का पाठवलं?

संतोष कानडे

मुघल सम्राट औरंगजेबने स्वतःच्या मोठ्या भावाचं शीर कापून ते वडिलांकडे पाठवलं होतं. त्याचं तोंडही त्याने बघितलं नाही.

शाहजहांला चार मुलं होती. दारा शिकोह हा शाहजहानचा ज्येष्ठ मुलगा होता. दुसरा मुलगा शुजा मिर्झा, तिसरा मुलगा मुराद बख्श आणि चौथा औरंगजेब

मोठा मुलगा दारा शिकोह हा विद्वान, सूफी विचारांचा, औरंगजेबाचा प्रमुख प्रतिस्पर्धी होता. त्यामुळे औरंगजेबने त्याचा काटा काढला.

ऑगस्ट १६५९ मध्ये औरंगजेबने दाराशुकोहला पकडले आणि त्याचे शिर कापले . शिवाय मुलगा सुलेमानशुकोहला अफू पाजून मारले गेले.

औरंगजेबने दाराशुकोहचे शिर नसलेले धड हत्तीवरून फिरवले. इतका क्रूर तो आपल्या भावासोबत वागला होता.

जेव्हा कापलेले शीर औरंगजेबसमोर आणले, तेव्हा मी या काफिरचे शीर जिवंतपणी पाहू इच्छित नव्हतो, आताही पाहणार नाही" असे म्हणून त्याने ते पाहण्यास नकार दिला.

हे शिर त्याने आग्रा किल्ल्यावर असलेल्या आपल्या वडिलांकडे पाठवले. सत्तेसाठी आणि धर्मासाठी मी काहीही करु शकतो, हे त्याने बापाला दाखवून दिलं.

वडील शाहजहांचाही औरंगजेबने छळ केला. एक क्रूर शासक म्हणून औरंगजेबाची इतिहासाने नोंद घेतली.

नार्को टेस्ट म्हणजे काय? ती कशी करतात?

<strong>येथे क्लिक करा</strong>