संतोष कानडे
गुन्हांची माहिती घेण्यासाठी नार्को अॅनालिसीस केलं जातं. मात्र ही टेस्ट शंभर टक्के विश्वासार्ह मानली जात नाही.
ज्याची टेस्ट करायची आहे त्याला सोडीयम पेंटोथल नावाचं औषध दिलं जातं. त्यामुळे सदरील व्यक्ती अर्धबेशुद्ध अवस्थेत जातो.
अशा अवस्थेत व्यक्तीचं मेंदूवरील नियंत्रण कमी होतं आणि प्रतिकारशक्तीही मंदावते. त्यामुळे लपवलेली माहिती बाहेर येण्याची शक्यता असते.
या टेस्टसाठी Thiopentone sodium किंवा Sodium Amytal हे केमिकल्स वापरली जातात.
टेस्ट करणाऱ्या व्यक्तीची लेखी संमती आवश्यक असते. शिवाय त्या व्यक्तीचे शारीरिक मानसिक अवस्था स्थिर असावी लागते.
या प्रक्रियेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं जातं. फॉरेन्सिक लॅब, हॉस्पिटल्समध्ये ही टेस्ट केली जाते.
नार्को टेस्ट पूर्णपणे विश्वासार्ह नसली तरी गुन्ह्यांच्या तपासासाठी अशी तपासणी दिशादर्शक ठरते.
टेस्टच्या प्रभावामध्ये असताना स्वप्न आणि वास्तव यातील फरक काहींना करता येत नाही. त्यामुळे व्यक्तीचा गोंधळ उडू शकतो.
ही टेस्ट फक्त कोर्टाच्या आदेशानेच करता येते. मात्र कोर्टामध्ये ही माहिती पुरावा म्हणून ग्राह्य धरली जात नाही.