औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांनी पुढे काय केलं?

संतोष कानडे

औरंगजेब

औरंगजेबाचा मृत्यू 3 मार्च 1707 रोजी अहमदनगरजवळ झाला. खुलताबाद येथे त्याची कबर आहे.

मृत्यू

त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्यात उत्तराधिकारी कोण होणार, यावर संघर्ष सुरू झाला.

मुहम्मद आझम शाह

त्याचा मुलगा मुहम्मद आझम शाह याने स्वतःला बादशहा घोषित केले.

मुअज्जम

दुसरा मुलगा मुअज्जम यानेही गादीवर दावा केला. 1707 मध्ये आग्र्याजवळ जाजाऊच्या युद्धात दोन्ही भावांमध्ये निर्णायक लढाई झाली.

सैन्याचा विजय

या युद्धात मुअज्जमच्या सैन्याचा विजय झाला आणि आझम शाह मारला गेला.

बहादुरशाह

त्यानंतर मुअज्जमने बहादुरशाह पहिला हे नाव धारण करून मुघल सम्राटपद स्वीकारले.

काम बख्श

औरंगजेबाचा तिसरा मुलगा मुहम्मद काम बख्श याने दक्षिण भारतात स्वतंत्र सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.

संघर्ष

बहादुरशाह आणि काम बख्श यांच्यातही संघर्ष झाला आणि 1709 मध्ये काम बख्शाचा पराभव होऊन त्याचा मृत्यू झाला.

सत्तासंघर्ष

औरंगजेबाच्या मुलांमधील या सत्तासंघर्षामुळे मुघल साम्राज्यातील अंतर्गत राजकीय अस्थिरता आणखी वाढली.

मुंबईच्या ताज हॉटेलची आजची किंमत किती?

<strong>येथे क्लिक करा</strong>