संतोष कानडे
मुघल सम्राट औरंगजेबाच्या काळात दिवाळीच्या सार्वजनिक उत्सवांवर काही निर्बंध घालण्यात आले होते.
२२ नोव्हेंबर १६६५ रोजी औरंगजेबाने गुजरातच्या सुभेदाराला एक आदेश दिल्याची नोंद आहे.
या आदेशानुसार अहमदाबादच्या बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या रात्री रोषणाई करण्यास मनाई करण्यात आली होती.
म्हणजेच, दिवाळीच्या काळातील सार्वजनिक रोषणाईवर निर्बंध घालण्यात आले होते.
याशिवाय, ९ एप्रिल १६६७ रोजी फटाक्यांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा आदेश दिल्याचा उल्लेखही मुघल दरबारी नोंदींमध्ये आढळतो.
मात्र, हा फटाक्यांवरील आदेश केवळ दिवाळीसाठी होता, असे ठामपणे सांगता येत नाही.
औरंगजेबाच्या या आदेशांमागे धार्मिक विचारांसोबतच सार्वजनिक उत्सवांवर नियंत्रण ठेवण्याचाही हेतू होता, असे इतिहासकारांचे विश्लेषण आहे.
औरंगजेबाने संपूर्ण मुघल साम्राज्यात दिवाळी साजरी करण्यावर बंदी घातली होती, असा ठोस पुरावा नाही.
त्याच्या कारकिर्दीतही सामान्य लोकांमध्ये दिवाळीचा सण साजरा केला जात होता.
त्यामुळे औरंगजेबाने दिवाळी पूर्णपणे बंद केली होती, असे ठामपणे म्हणता येत नाही. मात्र निर्बंध नक्कीच घातलेले होते.