गर्लफ्रेंडसाठी दारुचा घोट घेणार होता औरंगजेब, मग काय घडलं?

सकाळ वृत्तसेवा

शाहजहान

शाहजहान जेव्हा मुघल सम्राट बनला तेव्हा त्याचा मुलगा औरंगजेब पस्तिशीमध्ये होता.

औरंगजेब

औरंगजेबकडे दख्खनची सुभेदारी सोपवण्यात आलेली होती. दख्खनचा दरवाजा समजल्या जाणाऱ्या बुऱ्हाणपूरमध्ये तो थांबत असे.

मसर-उल-उमराह

बुऱ्हाणपूरमध्येच औरंगजेबला प्रेम सापडलं. याचा उल्लेख मसर-उल-उमराह या पुस्तकामध्ये आहे. याच ठिकाणी औरंगजेबची मावशी रहायची.

नर्तकी आणि गायिका

मावशीकडे एक नर्तकी आणि गायिका होती. तिचं नाव होतं हिराबाई जैनाबादी. ती आंबे तोडत असताना औरंगजेबने तिला न्याहाळलं आणि प्रेमात पडला.

हिराबाई

हिराबाईकडे पाहून राजकुमार औरंगजेब बेशुद्ध पडला होता, असंही हमीदुद्दीन खान या चरित्रकाराने लिहून ठेवलं आहे.

जैनाबादी

औरंगजेब हिराबाई जैनाबादीच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की, कधीही दारु न पिण्याची शपथ तो मोडण्यास तयार झाला.

मद्य

हिराबाईने आग्रह केल्यानंतर त्याने मद्याचा पेला तोंडाला लावला, मात्र हिराबाईने त्याला रोखलं आणि स्वतः तो पेला रिचवला.

औरंगाबाद

पुढे वर्षभरात हिराबाईचं निधन झालं. तेव्हाच्या औरंगाबादमध्ये हिराबाईचं दफण करण्यात आलं.

या ठिकाणच्या सीताफळांची निजामाला पडली होती भूरळ

<strong>येथे क्लिक करा</strong>