'या' ठिकाणच्या सीताफळाची निझामाला पडली होती भूरळ

संतोष कानडे

सीताफळ

सध्या सीताफळांचा सीझन सुरु आहे. दिवाळीच्या अगोदर महिन्याभरापासून सीताफळ बाजारात येतात

बीड

बीड हे सीताफळांचं हब म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण इथल्या डोंगररांगांमध्ये मुबलक सीताफळ मिळतं

प्रोसेसिंग युनिट

यापूर्वी अनेक नेत्यांनी आपल्या जाहीरनाम्यात सीताफळ प्रोसेसिंग युनिटबद्दल घोषणा केल्या, परंतु त्या हवेतच विरल्या

बालाघाट

बीड जिल्हा हा बालाघाटाच्या डोंगररांगंनी वेढलेला आहे. या डोंगरांमध्ये अविट गोडीचं सीताफळ मिळतं

जीआय मानांकन

बीडच्या सीताफळाची गोडी इतर कुठल्याही सीताफळाला नाही. त्यामुळे या फळाला भारत सरकारचं जीआय मानांकन मिळालेलं आहे

इतिहास

इतिहासातदेखील या सीताफळाचा उल्लेख आढळतो. हैदरबादच्या निझामाला बीडचं हे सीताफळ फार आवडायचं.

मराठावाडा

बीड आणि मराठावाड्यातील जिल्हे हे हैदराबाद संस्थानात होते. त्यामुळे इथल्या संस्कृतीवर निझामाचा प्रभाव आहे

हैदराबाद

निझामासाठी बीडहून खास सीताफळांच्या टोपल्या हैदराबादला पोहोच केल्या जायच्या.

मांजरसुंबा

बीडच्या धारुर, मांजरसुंबा, पाटोदा, शिरुर, वडवणी या भागांमध्ये असलेल्या डोंगरात मोठ्या प्रमाणावर सीताफळ मिळतं.

दिवाळीमध्ये मुघलांच्या महलात भाज्या का आणल्या जात नसत?

येथे क्लिक करा