संतोष कानडे
औरंगजेबाला आयुष्याच्या शेवटी उपरती झाल्याचं इतिहासकार सांगतात. त्याच्या स्वतःच्या निर्णयांबद्दल, चुकांबद्दल खंत असल्याचं त्यावरुन दिसून येतं.
''मला आता काहीही समजत नाहीये, मी एकटा आलो हो आणि एकटाच जाणार आहे.'' अशी ओळ त्याच्या एका पत्रात आहे.
आयुष्याचा मोठा भाग सत्तेसाठी आणि युद्धांमध्ये गेला, पण त्यातून मनःशांती मिळाली नाही, अशी भावना औरंगजेबाने व्यक्त केली होती.
औरंगजेबाने स्वतःला 'पापांचे ओझे वाहणारा माणूस' असल्याचे नमूद केले आणि ईश्वराच्या न्यायाबद्दल भावना व्यक्त केल्या होत्या.
औरंगजेबाने मृत्यूपूर्वी आपल्या मुलांना लिहिलेल्या पत्रांमध्ये आयुष्याबद्दलची खोल खंत बोलून दाखवली होती.
या पत्रांतून त्याला सांसारिक वैभव क्षणभंगुर असल्याची जाणीव झाल्याचे दिसून येते.
एका विजयी सम्राटापेक्षा आयुष्याचा हिशेब मांडणारा वृद्ध आणि चिंतनशील मनुष्य शेवटच्या काळात दिसून आला.
औरंगजेबाची पत्रं अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहेत. मराठीतही त्याचे अनुवाद आहेत.
एवढा मोठा सम्राट मात्र आयुष्याबद्दल आणि भूतकाळाबद्दल नैराश्य बाळगून होता, हे शेवटी दिसून आलं.