संतोष कानडे
औरंगजेब हा सुन्नी इस्लामच्या हनाफी पंथाचा कट्टर अनुयायी होता आणि शरिया कायद्याचे पालन करण्यावर त्याचा विशेष भर होता.
त्याने सर्व सूफी संत किंवा सर्व सूफी परंपरांचा विरोध केला नव्हता, मात्र दर्ग्यांवर होणारी अति पूजापद्धती, संगीत आणि काही लोकपरंपरा इस्लामी तत्त्वांशी विसंगत असल्याचे त्याचे मत होते.
औरंगजेबाच्या आदेशाने तयार करण्यात आलेल्या 'फतावा-ए-आलमगीरी' या इस्लामी कायद्याच्या ग्रंथातून शरियानुसार धार्मिक आचरणावर त्याने दिलेला भर स्पष्ट दिसतो.
औरंगजेबाच्या कारकिर्दीवर आधारित समकालीन फारसी ग्रंथ 'मआसिर-ए-आलमगीरी'मध्ये त्याने धार्मिक शिस्तीवर भर दिल्याचे उल्लेख आढळतात.
इतिहासकार सतीशचंद्र यांच्या मते, औरंगजेबाने इस्लामी तत्त्वांशी विसंगत वाटणाऱ्या काही धार्मिक प्रथांना विरोध केला होता.
इतिहासकार ऑड्री ट्रश्के यांनीही नमूद केले आहे की, औरंगजेबाचा विरोध सूफी संतांना नव्हता, तर काही विशिष्ट धार्मिक प्रथांपुरता मर्यादित होता.
विशेष म्हणजे, औरंगजेबाने अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याला भेट दिल्याच्या आणि तेथे देणग्या दिल्याच्या ऐतिहासिक नोंदी उपलब्ध आहेत.
उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांनुसार, त्याने सूफी संतांचा नव्हे तर दर्ग्यांशी संबंधित काही लोकपरंपरा आणि पूजापद्धतींचा विरोध केला होता.
ओरंगजेबाचा हा विरोध केवळ त्या-त्या प्रथांपुरता मर्यादित होता. वास्तिवक तो कट्टर इस्लाम पाळणारा होता.