औरंगजेबाच्या सैन्यात किती हिंदू सरदार होते?

संतोष कानडे

औरंगजेब

औरंगजेबाच्या सैन्यात आणि प्रशासनात हिंदू सरदारांची मोठी संख्या होती. त्यामध्ये राजपूत, मराठे आणि इतर हिंदू समाजांतील सरदारांचा समावेश होता.

मुघल

मुघल काळात सरदारांना त्यांच्या पदानुसार ‘मनसबदार’ म्हटले जात असे. त्यांच्याकडे सैन्याची जबाबदारी तसेच प्रशासकीय कामेही असत.

हिंदू मनसबदार

इतिहासकार एम. अथर अली यांच्या The Mughal Nobility Under Aurangzeb या संशोधनात हिंदू मनसबदारांची आकडेवारी दिली आहे.

औरंगजेब

या आकडेवारीनुसार, औरंगजेबाच्या कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे १६५८ ते १६७८ दरम्यान एकूण ४८६ मनसबदारांपैकी १०५ हिंदू होते.

हिंदू

म्हणजेच या उच्चपदस्थ मनसबदारांमध्ये हिंदूंचे प्रमाण २१.६ टक्के होते.

उत्तरार्ध

औरंगजेबाच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात म्हणजे १६७९ ते १७०७ दरम्यान एकूण ५७५ मनसबदारांपैकी १८२ हिंदू होते.

हिंदू

या काळात हिंदू मनसबदारांचे प्रमाण वाढून ३१.६ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते.

मराठा

या वाढीमागे मराठा सरदारांची मुघल सेवेत झालेली मोठ्या प्रमाणावरील भरती हे महत्त्वाचे कारण होते.

मिर्झा राजा जयसिंग

मिर्झा राजा जयसिंग, जसवंतसिंग यांसारख्या राजपूत सरदारांना औरंगजेबाच्या दरबारात उच्च मनसब आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्या होत्या.

हिंदू सरदार

त्यामुळे औरंगजेबाच्या सैन्यात हिंदू सरदार नव्हते किंवा त्यांना उच्च पदे मिळत नव्हती, असा दावा करता येत नाही.

औरंगजेबाने देशातील या शहरांची नावं बदलली होती...

<strong>येथे क्लिक करा</strong>