संतोष कानडे
मुघल सम्राट औरंगजेबाने १६५८ ते १७०७ या काळात राज्यकारभार करताना जिंकलेल्या प्रदेशांतील काही शहरांना आणि ठिकाणांना नवीन फारसी किंवा इस्लामी नावे दिली होती.
महाराष्ट्रातील खडकी शहराचे नाव औरंगजेबाच्या दख्खनच्या दुसऱ्या सुभेदारीच्या काळात औरंगाबाद करण्यात आले.
मथुरेला इस्लामाबाद आणि वृंदावनला मुमिनाबाद अशी नावे देण्यात आल्याचा उल्लेख औरंगजेबाच्या दरबारी इतिहासग्रंथ 'मआसिर-ए-आलमगीरी'मध्ये आढळतो.
दक्षिण भारतातील विजापूरला दार-उज-जफर आणि गोवळकोंडा अर्थात हैदराबादला दार-उल-जिहाद अशी बिरुदे देण्यात आली होती.
महाराष्ट्रातील ब्रह्मपुरी या ठिकाणाला इस्लामपुरी असे नाव देण्यात आले. १६९५ पासून औरंगजेबाने या परिसरात आपली छावणी ठेवली होती.
ऐतिहासिक संशोधनानुसार मिरजला मुर्तजाबाद, अकलूजला असदनगर आणि पेडगावला बहादूरगड अशी नावे देण्यात आल्याचे उल्लेख आढळतात.
याशिवाय कर्नाटकातील रायचूरला फिरोजनगर आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याला नुसरतगड असे नाव दिल्याचे संशोधनपर नोंदींमध्ये नमूद आहे.
या नामकरणामागे मुघल सत्तेचा प्रभाव, लष्करी विजय आणि राजकीय वर्चस्व दर्शवण्याचा हेतू असल्याचे इतिहासकारांच्या अभ्यासातून दिसते.
मात्र या सर्व नावांचा वापर सर्वसामान्य लोकांमध्ये कायमस्वरूपी रूढ झाला होता, असे म्हणता येत नाही. अनेक ठिकाणी जुनी नावेच व्यवहारात कायम राहिली.