औरंगजेबचं महिला धोरण नेमकं कसं होतं?

संतोष कानडे

मुघल

मुघलांनी भारतावर ३३० वर्षे राज्य केलं. त्यातल्या एकट्या औरंगजेब बादशहाने ४९ वर्षे सत्ता गाजवली. त्यामुळे त्याचं महिलांच्या बाबतीच धोरण काय होतं, ते पाहूया.

औरंगजेब

औरंगजेब हा घरातील स्त्रियांना प्रचंड मानसिक त्रास द्यायचा. त्यामुळे त्यांना असुरक्षिततेचा सामना करावा लागला.

अविवाहित

राजघराण्यातील सत्ता बाहेर जाऊ नये या भीतीपोटी त्याने आपल्या अनेक मुलींना आयुष्यभर अविवाहित ठेवले.

सामाजिक निर्बंध

औरंगजेबने शरियत कायद्यानुसार महिलांवर अनेक सामाजिक निर्बंध लादले, ज्यामुळे महिलांच्या सार्वजनिक जीवनातील वावरावर मर्यादा आल्या.

हरम

औरंगजेबाच्या हरममध्ये हजारो महिला होत्या, जिथे त्यांचे जीवन केवळ बादशहाच्या मर्जीवर अवलंबून असे; त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता.

धार्मिक

औरंगजेबाच्या विस्तारवादी आणि धार्मिक धोरणांमुळे अनेक राजपूत महिलांना आपला स्वाभिमान जपण्यासाठी आत्मदहनासारखी टोकाची पावले उचलावी लागली.

संगीतावर बंदी

औरंगेजबाने दरबार आणि सार्वजनिक ठिकाणी संगीतावर बंदी घातली, ज्यामुळे अनेक महिला कलाकार आणि गायिकांचे उपजीविकेचे साधन हिरावले गेले.

जिझिया कर

जिझिया कराच्या अंमलबजावणीमुळे अनेक गरीब हिंदू कुटुंबांवर आर्थिक ओझे वाढले, ज्याचा सर्वाधिक फटका घरातील महिलांना आणि त्यांच्या पोषण आहाराला बसला.

कठोर शिक्षा

याच्या धोरणांचा विरोध करणाऱ्या महिलांना कठोर शिक्षा दिल्या जात असत, ज्यामुळे त्या काळात महिलांचे राजकीय मत व्यक्त करणे धोक्याचे होते.

चंद्रावरुन पृथ्वी कशी दिसते? पाहा फोटो....

<strong>येथे क्लिक करा</strong>