चंद्रावरुन काढलेला पृथ्वीचा पहिला रंगीत फोटो; ५८ वर्षांपूर्वीचा फोटो आला समोर

संतोष कानडे

चंद्रावरुन पृथ्वी कशी दिसते?

हा फोटो थंट चंद्रावरुन काढलेला आहे. चंद्रावरुन पृथ्वी कशी दिसते, हे या फोटोमुळे जगाच्या लक्षात आलं.

मोहीम

तब्बल ५० वर्षांनंतर नासाकडून 'आर्टेमिस २' मोहीम राबवली जाणार आहे. त्यामुळे हा फोटो पुन्हा चर्चेत आलाय

अपोलो ८

'अपोलो ८' मोहिमेदरम्यान डिसेंबर १९६८ रोजी हा फोटो काढण्यात आला होता. चंद्रावरुन काढलेला पृथ्वीचा हा पहिला रंगीत फोटो ठरला.

अर्थराईज

याला अर्थराईज असंही म्हटलं जातं. हा फोटो अंतराळवीर विल्यम अँडर्स यांनी काढला होता.

पृथ्वी

मानवी इतिहासात पहिल्यांदाच पृथ्वी अशा प्रकारे अंतराळातून एका रंगीत रूपात जगासमोर आली होती.

पर्यावरण

या फोटोमुळे जगभरात पर्यावरणाविषयी मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण झाली.

नासा

नासाच्या नव्या मोहिमेमुळे आता पुन्हा हा फोटो चर्चेत आला असून व्हायरलदेखील झालाय.

आर्टेमिस २

नासाची आर्टेमिस २ ही मोहीम चर्चेत आहे. हे यान चंद्राच्या अगदी जवळून जाणार असल्याने आणखी काही फोटो मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात सर्वात शुद्ध सोनं कुठे मिळतं?

येथे क्लिक करा