Shubham Banubakode
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर २७ वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात होता.
मात्र, उभ्या आयुष्यात त्याला मराठ्यांचा पराभव करणं शक्य झालं नाही. अखेर १७०७ मध्ये महाराष्ट्रातच त्याचा मृत्यू झाला.
मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी त्याने अखेरचं मृत्यूपत्र लिहिलं होतं.
हे मृत्यूपत्र त्याने स्वत:त्या हाताने लिहून मृत्यृशय्येवरील उशीच्या खाली ठेवल्याचं मानलं जातं.
इंडिया ऑफीसच्या ग्रंथालयातील हस्तलिखीत १३४४, फोलिओ ४९ ब मध्ये तसा उल्लेख आहे.
इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी त्यांच्या औरंगजेबाजाचा इतिहास या पुस्तकातही या मृत्यूपत्राचा उल्लेख आहे.
औरंगजेब त्याच्या मृत्यूपत्रात लिहितो, "माझ्या साऱ्या जीवनात मी अगतिक होतो आणि अगतिक म्हणूनच या जगाचा मी निरोप घेत आहे''
''माझ्या मुलांपैकी ज्याच्या भाग्यामध्ये माझ्या साम्राज्याचा सम्राट होण्याचे असेल त्याने कामबक्षला कोणताही उपद्रव देऊ नये''
''दियानतखान याची योग्यता इतर सर्व बादशाही नोकरपेक्षा अधिक आहे, असे मी समजतो''
''माझ्या हयातीत साम्राज्याची विभागणी करण्याची योजना मी आखली होती ती जर मोहम्मद आजम शहा याला मान्य असेल तर त्याची विनवणी करा''
''पिढीजात नोकरांना बडतर्फ करू नका किंवा त्यांचा जाणूनबुजून छळदेखील करू नका''
''दिल्लीच्या सिंहासनावर जो कोणी येईल त्याच्याकडे आग्रा आणि दिल्ली या दोन सुभ्यांपैकी एकामा ताबा जावा''
''जो कोणी या दोहोंपैकी पहिल्या सुम्याचा ताबा घेण्याचे कबूल करेल त्याच्याकडे जुन्या साम्राज्यातले आग्रा माळवा, गुजरात आणि अजनीर हे सुमे जातील''
''या सुभ्यांच्या अंतर्गत असलेले चकला व त्याचप्रमाणे दक्षिणचे चार सुने म्हणजे खानदेश, वन्हाड, औरंगाबाद आणि विदर व त्या सुन्यातील बंदरे या सर्व भाग त्याला जाईल''
''जो कुणी दुसऱ्या सुभ्यांचा म्हणजे दिल्लीचा ताबा घेण्यास मान्यता देईल त्याच्याकडे दिल्ली, पंजाब, काबूल, मुलतान, तट्टा, कास्नीर, बंगाल, ओरिसा, बिहार, अलाहाबाद आणि औध हे ११ सुभे जातील"