Shubham Banubakode
जेव्हाही मुघल काळातील खाद्यपदार्थांची चर्चा होते. तेव्हा चिकन, मटण, मासे अशा मांसाहारी पदार्थांचा उल्लेख होतो.
बहुतेक मुघल सम्राट मांसाहार करायचे असा सर्व साधारण समज आपल्याकडे आहे. मात्र, हे तितकं सत्य नाही.
अकबर, जहांगीर किंवा औरंगजेबसुद्धा शाकाहारी खाद्यपदर्थांचे चाहते होते.
सुरवातीच्या काळात औरंगजेबाला मुर्ग मुस्ललम प्रचंड आवडायचं.
औरंगजेबाने एकदा त्याच्या मुलाला पत्र लिहिलं होतं, त्यात त्याने खिचडी आणि बिर्याणीचा उल्लेख होता.
यात पत्रात त्याने बिर्याणी बनवणाऱ्या सुलेमान नावाच्या खानसामाला माझ्याकडे पाठव, असंही सांगितलं होतं.
मात्र मुघल बादशहा झाल्यानंतर तो युद्धात असा गुंतला की हळूहळू त्याची मांसाहाराची सवय सुटली.
औरंगजेबाच्या किचनमध्ये मोठ्या प्रमाणात हिरव्या भाज्या आणि फळं राहायची.
औरंगजेबाला आंबे प्रचंड आवडायचे.
औरंगजेबाला गव्हापासून बनवलेले कबाब आणि चन्याच्या दाळीपासून बनवलेला पुलावही प्रचंड आडवडायचा.