धर्मांतर करणाऱ्यांसाठी औरंगजेबची ऑफर काय होती? वाचून धक्का बसेल

संतोष कानडे

औरंगजेब

मुघल बादशहा औरंगजेब हा कट्टर मुस्लिम होता. त्याने भारतात मोठ्या प्रमाणावर धर्मांतरं केली.

ऑफर

औरंगजेबाने ७ एप्रिल १६८५ रोजी एक आदेश काढला आणि इस्लाम स्वीकारणाऱ्यांना ऑफर दिली.

हिंदू

हिंदू पुरुष असेल तर त्याला ४ रुपये आणि हिंदू स्त्री असेल तर तिला २ रुपये देऊ केले. पैसे एका महिन्याच्या पगाराएवढे होते.

धर्मांतर

याशिवाय धर्मांतर केलेल्यांसाठी जिझिया करातून पूर्णपणे सूट देण्यात येई. सरकारी अधिकारी असतील तर त्यांना बढती मिळत असे.

इस्लाम

समजा एखाद्या कैद्याने हिंदू धर्म सोडून इस्लाम स्वीकारला तर त्याला कारावासातून मुक्त करण्याचे आदेश काढण्यात येत.

जमिनीचा पट्टा

जर कुणी उच्चवर्णीय किंवा जमिनदाराने धर्मांतर केले तर त्याला जमिनीचा पट्टा मिळे किंवा खिलत म्हणजे सन्मानाचे पोशाख दिले जात.

अखबार

हे उल्लेख सियाहा अखबारात-ए-दरबार-ए-मुअल्ला यात आणि राजस्थान आर्काइव्हमध्ये आहेत.

मंदिर

याशिवाय औरंगजेबाने मंदिरं तोडण्याबाबतही फर्मानं काढलेली होती. इतर धर्माचा द्वेष करणारा सम्राट म्हणून त्याची ओळख होती.

इतिहासाने गद्दार ठरवलेला राजा जयचंद कोण होता?

<strong>येथे क्लिक करा</strong>