संतोष कानडे
राजा जयचंद हा गहरवार वंशाचा राजा होता. ११७० ते ११९४ या काळात त्याने राज्य केलं.
राजा जयचंदाचं साम्राज्य कनौज आणि वाराणसीसह बिहारच्या काही भागापर्यंत पोहोचलं होतं.
कनौज हे त्याकाळी भारतातलं सर्वात श्रीमंत आणि वैभवशाही राज्य होतं.
राजा जयदंचाचा पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संघर्ष झाला. उत्तर भारतावर वर्चस्व मिळवण्यासाठी चुरस होती.
इतिहासामध्ये राजा जयचंदाला गद्दार म्हणून हिणवलेलं आहे. परंतु यातही मतमतांतरे आहेत
पृथ्वीराज चव्हाण यांचा सूड घेण्यासाठी राजा जयचंदाने मोहम्मद घोरीला भारतावर आक्रमण करण्यास आमंत्रित केल्याचा आरोप होतो.
असं असलं तरी ११९४च्या युद्धात राजा जयचंद स्वतः मोहम्मद घोरीच्या सैन्याविरुद्ध लढला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
मात्र इतिहासाने राजा जयचंदाला एक गद्दार म्हणून ओळख दिली. त्यावरुन संजय राऊतांनी उल्लेख केला.
एकनाथ शिंदेंचा उल्लेख राऊतांनी राजा जयदंच असा केला. त्यातून त्यांना गद्दार असाच पुनरुल्लेख करायचा होता.