'या' पक्ष्यांना नसते मूत्राशय? मग लघुशंका करतात का?

संतोष कानडे

मूत्राशय

तुम्हाला माहीत आहे का? बहुतांश पक्ष्यांना माणसांप्रमाणे मूत्राशय नसते.

कावळा

कबूतर, चिमणी, कावळा, पोपट, मोर आणि गरुड अशा अनेक पक्ष्यांमध्ये मूत्राशय आढळत नाही.

लघवी

मग हे पक्षी लघवी कशी करतात, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

मूत्रपिंड

खरं तर पक्ष्यांनाही मूत्रपिंड असतात आणि ते रक्तातील टाकाऊ पदार्थ गाळतात.

नायट्रोजनयुक्त कचरा

मात्र, त्यांच्या शरीरात तयार होणारा नायट्रोजनयुक्त कचरा मुख्यतः युरिक ॲसिडच्या स्वरूपात बाहेर टाकला जातो.

युरिक ॲसिड

हे युरिक ॲसिड पांढऱ्या रंगाच्या घट्ट पदार्थाच्या स्वरूपात दिसते. त्यामुळे पक्ष्यांच्या विष्ठेमध्ये पांढरा भाग दिसतो.

मूत्र आणि विष्ठा

पक्ष्यांच्या शरीरात मूत्र आणि विष्ठा बाहेर टाकण्यासाठी क्लोआका नावाचा सामायिक मार्ग असतो.

वजन

मूत्राशय नसल्यामुळे त्यांना मूत्र साठवून ठेवण्याची गरज नसते. यामुळे पक्षांचे वजन कमी राहण्यास मदत होते.

टाकाऊ पदार्थ

अशा प्रकारे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याची पक्ष्यांची पद्धत माणसांपेक्षा वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.

तुम्ही दुसऱ्या गल्लीतले आहात, हे कुत्र्यांना कसं कळतं?

<strong>येथे क्लिक करा</strong>