Sandip Kapde
पुण्याच्या खेड तालुक्यातील चाकण गाव आज एक मोठं औद्योगिक केंद्र आहे. पुणे-नाशिक आणि मुंबई-अहमदनगर हायवे यामुळे वाहतुकीचा मुख्य केंद्रबिंदू!
दशरथ राजाच्या रथाचं चाक अडकलं आणि तिथेच चाकेश्वराचं मंदिर उभं राहिलं. ‘चक्रीनगर’चं नाव पुढं ‘चाकण’ झालं!
ज्ञानेश्वरीत चाकणचा उल्लेख ‘चाकण ८४’ असा आढळतो. ही ओळख आजही स्थानिक परंपरेत टिकून आहे.
चाकणचा संग्रामदुर्ग किल्ला, आधी भुईकोट किल्ला म्हणून ओळखला जात होता. इतिहासकार ग्रँड डफच्या मते, बुशदीद हबशीने हा बांधला.
शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यातून किल्ला जिंकला आणि फिरंगोजी नरसाळा यांनाच किल्लेदार ठेवलं.
१६६० मध्ये शाहिस्तेखानाने चाकणवर हल्ला केला. ३०० मराठ्यांनी ५६ दिवस किल्ला लढवत ठेवला!
मुघलांनी भुयार खोदून तटाला सुरुंग लावला. मोठं भगदाड पडलं आणि मुघल किल्ल्यात शिरले.
शाहिस्तेखानाच्या विजयावर औरंगजेब खुश झाला आणि चाकणचं नाव ‘इस्लामाबाद’ ठेवलं.
१६६९-७० मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला. महाराजांनी सरदेशमुखी आणि चौथाईच्या सनदा दिल्या.
आज संग्रामदुर्ग किल्ला मोडकळीस आला आहे. औद्योगिकीकरणामुळे इतिहास झाकोळतोय, पण स्मरण ठेवणं आपली जबाबदारी आहे!