सकाळ वृत्तसेवा
भीमा नदीकाठावर कडेकपारीत प्राचीनकाली हेमाडपंती श्री सिद्धेश्वराचं मंदिर आहे. या मंदिराजवळच एक किल्ला आहे. ज्या किल्ल्यात औरंगजेबाने वास्तव्य करत दिल्लीचा कारभार पाहिला.
siddheshwar temple
esakal
सोलापूरपासून 40 किलोमीटर अंतरावर माचणूर तीर्थक्षेत्र आहे. तिथं माचणूर किल्ला आहे. या किल्ल्यात मुगल सैन्याची मोठी छावणी होती. तसंच औरंगजेब इथं बसून न्यायदान करत असल्याचं बोललं जात.
Machanur Fort
esakal
जेव्हा मराठ्यांच्या हल्ल्यांनी त्रस्त झाल्यावर 1695 च्या जवळपास औरंगजेबाने हा किल्ला बांधला. ब्रम्हपुरी गावाजवळील भिमा नदीकाठी हा किल्ला बांधण्यात आला.
Machanur Fort
esakal
असं म्हटलं की, जेव्हा औरंगजेबाने हा प्रदेश जिंकला त्यावेळी त्याच्या सैनिकांना सिद्धेश्वराचं पिंड फोडण्याची आज्ञा दिली. परंतु सैनिकांवर भुंग्यांच्या थव्याने हल्ला चढविला.
Machanur Fort
esakal
नंतर संतापलेल्या औरंगजेबाने नैवेद्य म्हणून गोमांस पाढवलं परंतु त्या गोमासाचं पांढऱ्या फुलात रुपांतर झालं. त्यामुळे या गावाला मास-नूर असं म्हटलं गेलं त्यानंतर त्याचा अपभ्रंश माचणूर झाला.
Machanur Fort
esakal
असं म्हटलं जातं की, मठाच्या लगतच औरंगजेबचा किल्ला होता. सगळा प्रकार घडल्यावर औरंगजेबाने ११ रुद्राभिषेक श्रावण महिन्यामधे सुरु केले. श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर ब्राम्हणाचे अधिष्ठान असायचं. या महिन्यामधे पूजा -अर्च्यासाठी औरंगजेब कालावधीन अर्थसहाय्य मिळायचं.
Machanur Fort
esaskal
माचणूर गडाच्या प्रवेशद्वारावर शत्रूला थेट मारा करता येऊ नये यासाठी भिंत आणि दोन बुरुज उभारण्यात आल्यात.
Machanur Fort
esakal
तुम्हाला जर माचणूर किल्ला पाहायचा असेल तर सोलापूरपासून 40 किलोमीटर आणि मंगळवेढ्यापासून 14 किलोमीटर अंतरावर आहे.
Machanur Fort
esakal
माचणूर गावात जाणार्या रस्त्यावर प्रथम सिध्देश्वर मंदिर लागते आणि रस्ता संपतो तेथे माचणूरचा किल्ला आहे. किल्ल्यावर कोणत्याही सोयी नाहीत.
Machanur Fort
esakal
Wai Tourist Guide
Sakal