महाराष्ट्रातल्या 'या' गावात आहे औरंगजेबची दुसरी कबर?

संतोष कानडे

औरंगजेब

औरंगजेबाचा मृत्यू १७०७ मध्ये तत्कालीन अहमदनगरजवळील भिंगार परिसरात झाला.

भिंगार

भिंगारजवळील आलमगीर या भागात त्याच्या मृत्यूशी संबंधित ऐतिहासिक आठवणी आणि स्थानिक परंपरा आढळतात.

मृत्यू

स्थानिक दाव्यानुसार, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचे काही अवयव याच परिसरात पुरण्यात आले होते.

कबर

त्या ठिकाणी एका चौथऱ्यावर असलेली कबर औरंगजेबाच्या पुरलेल्या अवयवांशी संबंधित असल्याचा दावा केला जातो.

संदर्भ

त्यामुळे काही ठिकाणी या स्थळाचा उल्लेख औरंगजेबाच्या 'दुसऱ्या कबरी'च्या संदर्भात केला जातो.

आलमगीर

‘आलमगीर’ ही पदवी औरंगजेबाने वापरली होती, त्यामुळे या परिसराच्या नावाबाबतही ऐतिहासिक संदर्भ जोडले जातात.

पुरातत्त्वीय नोंदी

मात्र या स्थळाबाबतची माहिती आणि स्थानिक दावे यांना अधिकृत पुरातत्त्वीय नोंदींच्या पातळीवर औरंगजेबाची स्वतंत्र कबर म्हणून मान्यता असल्याचे स्पष्ट पुरावे उपलब्ध नाहीत.

खुलताबाद

औरंगजेबाची अधिकृत कबर छत्रपती संभाजीनगरजवळील खुलताबाद येथे आहे. खुलताबाद हे छत्रपती संभाजीनगर शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर आहे.

मुघल साम्राज्याच्या पतनाची 10 प्रमुख कारणं कोणती?

<strong>येथे क्लिक करा</strong>