संतोष कानडे
औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे सूफी संत शेख झैनुद्दीन शिराझी यांच्या दर्ग्याच्या परिसरात आहे.
मुघल सम्राट असूनही त्याने स्वतःसाठी भव्य समाधी बांधू नये, अशी इच्छा व्यक्त केल्याचे ऐतिहासिक नोंदींमध्ये नमूद आहे.
म्हणूनच औरंगजेबची कबर साधी, मोकळ्या आकाशाखाली आणि संगमरवरी घुमटाशिवाय बांधण्यात आली.
कबरीवरील संगमरवरी चौकट पुढील काळात हैदराबादच्या निजामाने बसवल्याचा उल्लेख आढळतो.
औरंगजेबाच्या कबरीवर दरवर्षी अनेक पर्यटक, इतिहास अभ्यासक आणि संशोधक भेट देतात.
कबरीभोवती कडेकोट सुरक्षा असते आणि संवेदनशील ठिकाण म्हणून प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवले जाते.
काही लोक कबरीबाबत अनेक गुढ आख्यायिका सांगतात, मात्र त्यांना ठोस ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही.
औरंगजेबाच्या साध्या कबरीची तुलना अनेकदा इतर मुघल बादशाहांच्या भव्य मकबऱ्यांशी केली जाते.
इतिहासकारांच्या मते, त्याच्या जीवनशैलीतील साधेपणा आणि धार्मिक विचारसरणीचा प्रभाव या कबरीच्या स्वरूपात दिसून येतो.