काश्मीरमध्ये औरंगजेब अमरनाथ गुहेत पोहचला होता, तिथे त्याला काय दिसलं?

संतोष कानडे

मुघल

मुघल बादशहा औरंगजेबसुद्धा अमरनाथ गुहेपर्यंत पोहोचला होता. त्याने १६६३ मध्ये काश्मीर यात्रा केली होती.

औरंगजेब

काश्मीर यात्रेवेळी औरंगजेबसोबत फ्रेंच फिजिशियन फान्सिस बर्नर होता. त्याने आपल्या 'ट्रॅव्हल्स इन द मुघल एम्पायर' या पुस्तकात काश्मीरधल्या स्थळांचं वर्णन केलं आहे.

अमरनाथ

याच पुस्ताकामध्ये बर्नरने संगसफेद (पांढरा दगड) असलेल्या गुहेचं वर्णन केलेलं आहे. ज्याला अमरनाथ गुहा म्हटलं जातं. पुस्तकातील पान क्रमांक ४१९ वर याबाबत लिहिलं आहे.

बादशहा

मुघल बादशहा औरंगजेबने १६१८ ते १६५८ या काळात मुघल सम्राटाची गादी सांभाळली. १७०७ मध्ये त्याचा मृत्यू झाला.

काश्मीर

१६६३ मध्ये औरंगजेबने काश्मीर यात्रा केल्याचा उल्लेख आहे. अमरनाथ गुहेचा उल्लेख करताना बर्नर म्हणतो, गुहेच्या छतावरुन पाणी टपकत असल्याने चुना जमा झाला आहे.

महादेव

तो पुढे लिहितो, गुहेत बर्फ आणि बर्फाचे तुकडे आहेत.. अनेक हिंदू याला महादेवाचं प्रतिरुप मानतात आणि पूजा करतात.

पुस्तक

अमरनाथ परिसरात होणारा पाऊस, त्यामुळे निर्माण होणारे धोके, याबद्दल पुस्तकात लिहिलं आहे. औरंजेबाने अमरनाथला दिलेल्या भेटीचं वर्षही यात लिहिलं आहे.

प्रथा परंपरा

औरंगजेब बादशहाला काश्मीर आवडलं होतं. पण तिथल्या काही प्रथा परंपरा त्याला पटलेल्या नव्हत्या.

आदेश

काश्मीरच्या चालीरिती आणि इतर प्रथा-परंपरांबाबत औरंगजेब बादशहाने काही आदेश काढून त्यात बदल करण्याचं सुचवलेलं होतं.

छावा'मध्ये दिसलेलं शंकराचं मंदिर कुठे आहे? महाराष्ट्रातच आहे 'हे' गाव | esakal
<strong>छावा'मध्ये दिसलेलं शंकराचं मंदिर कुठे आहे? महाराष्ट्रातच आहे 'हे' गाव</strong>