Payal Naik
विकी कौशल याचा 'छावा' चित्रपट प्रचंड गाजतोय.
काही दिवसातच या चित्रपटाने तब्बल ३०० कोटींचा गल्ला जमवलाय. या चित्रपटाचा प्रत्येक सिन प्रेक्षकांमध्ये व्हायरल होतोय.
असाच एक सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. राज्याभिषेकाआधी छत्रपती संभाजी महाराज शंकराच्या पिंडीवर अभिषेक करतात.
'छावा'मध्ये दिसलेला हा सीन नेमका कुठे शूट झालाय तुम्हाला माहीत आहे का?
'छावा'मध्ये शंकराच्या मंदिराचा जो सीन दिसला त्याचं शूटिंग सातारा जिल्ह्यात झालं आहे.
बारामोटेची विहिर या ठिकाणी 'छावा'मधील या सीनचं शूटिंग झालंय.
सातारा शहराकडून जो रस्ता पुण्याकडे येतो तिथे १२ कि.मी. अंतरावर लिंब फाटा लागतो. तिथून आत गेल्यावर लिंब नावाचं गाव आहे.
गावातील शेरीची वाडी या ठिकाणी बारामोटेची विहिर आहे. या विहिरीतून पाणी काढण्यासाठी एकाच वेळी १२ मोटा लावल्या जातात असं सांगण्यात येतं.
विहिरीत राजवाडा आणि महालासारखी जागा असलेली दिसते. याशिवाय गेल्या ३०० वर्षात या विहिरीचं पाणी कधीही आटलं नाही, असंही सांगण्यात येतं.
थोरले शाहू महाराज यांच्या पत्नी श्रीमंत वीरुबाई भोसले यांच्या कारकीर्दीत या विहिरीचं बांधकाम करण्यात आलं. १७१९ ते १७२४ या दरम्यान ही विहीर बांधण्यात आली.
सावत्र मुलाविरुद्ध कट रचणाऱ्या सोयराबाईंच्या भूमिकेसाठी मिळालं फक्त 'एवढं' मानधन?