Saisimran Ghashi
प्रेमासाठी एखाद्याला 20 वर्षे कैद? होय, ही एका मुघल राजकुमारीची खरी गोष्ट आहे!
ती होती जेबुन्निसा. सम्राट औरंगजेबाची कन्या. ती अत्यंत हुशार, शायरीची आवड असलेली आणि फारसी कवितांची प्रेमी होती.
बुंदेलखंडमधील एका कार्यक्रमात जेबुन्निसा महाराज छत्रसाल यांना भेटली आणि त्यांच्या प्रेमात पडली.
महाराज छत्रसाल हे मध्ययुगीन काळातील एक पराक्रमी हिंदू योद्धा होते, ज्यांनी औरंगजेबावर विजय मिळवला होता.
आपली मुलगी एका हिंदू राजावर प्रेम करते हे कळल्यावर औरंगजेब संतापला. त्याने जेबुन्निसाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती माघार घेत नव्हती.
शेवटी, अत्यंत कठोर निर्णय घेत, औरंगजेबाने स्वतःच्या मुलीला 20 वर्षे सलिमगढ किल्ल्यात नजरकैदेत ठेवले.
कैदेत असताना जेबुन्निसाने कृष्णभक्ती, प्रेम आणि विरह यावर आधारित शायरी केली. तिचे कार्य 'दिवाण-ए-मखफी' या नावाने प्रसिद्ध झाले.
20 वर्षांच्या कैदेनंतर जेबुन्निसाचा मृत्यू झाला. पण तिचे प्रेम, तिची कविता आजही जिवंत आहे.
जेबुन्निसाला काबुली गेटबाहेर तीस हजार बागेच्या परिसरात दफन करण्यात आले. आजही तिचा आत्मा तिथे वावरतो असे म्हणतात.