Monika Shinde
या वर्षी गणेश चतुर्थी २७ ऑगस्ट २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे. भक्तगण मोठ्या भक्तिभावाने आपल्या घरी गणपती बाप्पाचं स्वागत करतील.
गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक घरांमध्ये आणि मंडळांमध्ये गणपतीची स्थापना केली जाते. या दिवशी बाप्पाला आवडणाऱ्या गोष्टी अर्पण करून त्याची विशेष पूजा केली जाते.
पुराणांनुसार आणि धार्मिक मान्यतानुसार, गणपती बाप्पाला विशिष्ट प्रकारच्या नैवेद्य, दुर्वा, मोदक आणि फुले अर्पण केल्याने ते अधिक प्रसन्न होतात.
चला तर मग, गणपती बाप्पाला सर्वाधिक प्रिय असलेलं फूल कोणतं ते जाणून घेऊया
गणरायाला जास्वंदीचे (हिबिस्कस) फूल अतिशय प्रिय आहे. हे फूल अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होतात, असं मानलं जातं.
जास्वंदीचं फूल पवित्रतेचं आणि आध्यात्मिक शक्तीचं प्रतीक मानलं जातं. विशेषतः लाल जास्वंद हे गणपती बाप्पाच्या शक्ती, उत्साह आणि तेजाचे प्रतीक म्हणून पूजेमध्ये महत्त्वाचं मानलं जातं.