Monika Shinde
झाडं फक्त घरचं सौंदर्य वाढवत नाहीत, तर घरात सकारात्मक वातावरण तयार करतात. काही खास झाडं अशी आहेत जी मन, शरीर आणि घरात शांतता आणि ऊर्जा आणतात.
तुळस हे पवित्र झाड आहे. याचा वापर पूजेसाठी केला जातो. ती भक्तीभाव वाढवते, हवा शुद्ध ठेवते आणि घरात अंगणात किंवा गॅलरीत ठेवणं शुभ मानलं जातं.
स्नेक प्लांट रात्रीही ऑक्सिजन तयार करतो. त्यामुळे झोपेचं आरोग्य सुधारतं आणि मानसिक ताजेपणा टिकतो. ही शांतता देणारी वनस्पती घरात जरूर ठेवा.
मनी प्लांट घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो, पैशाचं आकर्षण वाढवतो असं मानलं जातं. ही बेल स्वरूपात वाढणारी वनस्पती घराच्या पूर्व दिशेला लावा.
एलोवेरा केवळ सौंदर्यवर्धक नाही, तर वातावरनातील टॉक्सिन्सही दूर करतो. यामुळे घरात ताजगी, शांती आणि आरोग्य दोन्ही टिकून राहतात.
लकी बाँबू हे झाड सौभाग्य, प्रेम आणि यश वाढवतो असं फेंगशुई मानतं. हे झाड पाण्यात ठेवलं जातं आणि कोणत्याही खोलीत शोभून दिसतं.
स्पायडर प्लांट वातावरणातील हानिकारक घटक शोषतो. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि ताजेपणा कायम राहतो. मेंटेन करायलाही सोपं झाड आहे.