Pranali Kodre
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना ऍडलेडमध्ये ६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
भारत ऑस्ट्रेलियामध्ये होणारा हा सामना दिवस-रात्र कसोटी (Day-Night Test) सामना आहे.
ऑस्ट्रेलियाचा हा १३ वा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. त्यांनी याआधी झालेले सर्व १२ दिवस-रात्र कसोटी सामने ऑस्ट्रेलियामध्येच खेळले आहेत.
ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत खेळलेल्या १२ दिवस-रात्र कसोटी सामन्यांपैकी ११ सामने जिंकले आहेत, तर एकमेव सामना पराभूत झाला आहे.
ऑस्ट्रेलियाने खेळलेल्या शेवटच्या दिवस-रात्र कसोटीतच ब्रिस्बेनमध्ये जानेवारी २०२४ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ८ धावांनी पराभव स्वीकारला होता.
त्याआधी ऑस्ट्रेलियाने ११ दिवस-रात्र कसोटी सामने खेळले होते, त्यातील सर्व ११ सामन्यात विजय मिळवला आहे.
ऑस्ट्रेलियाने १२ पैकी ७ दिवस-रात्र कसोटी सामने ऍडलेडला खेळले असून या सातही सामन्यात विजय मिळवले आहेत. यामध्ये २०२० मध्ये भारताविरुद्ध मिळवलेल्या विजयाचाही समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनला ३, तर पर्थ आणि होबार्ट येथे प्रत्येकी १ दिवस-रात्र कसोटी सामना खेळला आहे.
भारताने आत्तापर्यंत ४ दिवस-रात्र कसोटी सामने खेळले आहेत, यातील तीन सामने भारतात, तर एक ऑस्ट्रेलियात खेळले आहेत. भारताने मायदेशातील तिन्ही दिवस-रात्र कसोटी सामने जिंकलेत, तर ऑस्ट्रेलियात पराभव स्वीकारला आहे.