Pranali Kodre
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात सध्या ५ कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धा सुरू आहे.
या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनंतर १-१ अशी बरोबरी झाली आहे. आता तिसरा सामना ब्रिस्बेनला १४ डिसेंबर पासून सुरू होईल.
या कसोटी मालिकेदरम्यान ABC स्पोर्ट्सशी बोलताना काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंना लहानाचे मोठे होताना आवडता भारतीय खेळाडू कोण होता, असं विचारण्यात आलं होतं.
त्यावर उत्तर देताना बहुतांशी खेळाडूंचे मत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर हेच होते. कोणत्या खेळाडूंनी कोणाची नावं घेतली हे जाणून घेऊ.
ऑस्ट्रेलियाचा ट्रेविस हेड म्हणाला, त्याला सचिन तेंडुलकर हे नाव घेतले.
स्टीव्ह स्मिथनेही सचिन तेंडुलकर नाव घेताना तो स्टायलिस होता आणि गन बॅटर होता असं म्हटलं.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनेही सचिनचे नाव घेतले.
ऍलेक्स कॅरेने म्हटले की मी अजूनही शिकत आहे, त्यामुळे एमएस धोनी हा आवडता खेळाडू आहे.
ग्लेन मॅक्सवेल म्हणाला, सचिन तर आहे, पण त्याला व्हीव्हीएस लक्ष्मणला फलंदाजी कराताना पाहायला आवडायचे.
मिचेल मार्शनेही सचिन तेंडुलकरचे नाव घेणाना अंगणात त्याच्याप्रमाणे फलंदाजी करायला असं सांगितलं.
उस्मान ख्वाजाने विरेंद्र सेहवागचे नाव घेतले.